आडनावे

🙏🏼💐🙏🏼💐🙏🏼💐🙏🏼💐
माननीय साहेब
....
सप्रेम हर हर महादेव ....
आपण ऊपस्थीत केलेला प्रश्न कै. डाँ. गोविंद गारे यांचा संदर्भ ग्रथं *सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी*
या प्रबंधात शार्दुल आडनांव नाही ....?
आपल म्हणने व शंका आगदी बरो बर आहे गारे साहेबांचा प्रबंधात *शार्दुल* आडनांव नाही.
आपण प्रबंधाला प्रमाण मानायचे काय ...?
प्रबंधात नाशिक जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्याचे गांवे व त्या गावंची त्यावेळीची महादेव कोळी समाजाची लोकसंख्या दर्शवली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बहुतेक आडनांवे प्रबंधात समाविष्ठ नाहीत.
प्रबंधात नमुद केलेली बहुतेक आडनांवाचे गोत्र व कुळे आलेली आहेत या आडनांवा मध्ये नाशिक जिल्ह्यातील *पोटीदें* आडनाव आपणास दिसुन येईल  प्रबंधात पोटीदें आडनांव दिसते पंरतु गोत्रात त्या आडनांवाचा आन्ये कोणत्याही आडनांवा सोबत ऊल्लेख सापडत नाही.
प्रबंधाला प्रमाण मानायचे तर दिंडोरी या गावाचा ऊल्लेख प्रबंधात आहे व त्यावेळेची लोकसंख्या सुद्धा प्रबंधात आहे.
दिंडोरी गांवातील प्रमुख महादेव कोळी समाजाचे कुळ *चारोस्कर ,खराटे , गांगोडे, गांगुर्डे* हे आडनांवे प्रबंधातील आडनांवाचा यादित नाही.
प्रबंधात दिंडोरी तालुक्यातील कोचरगांव हे गांवाचे नाव व त्या गावची लोकसंख्या दर्शवली आहे पंरतु याच गावात महादेव कोळी समाजात *टोगांरे* हे आडनांव आहे ते प्रबंधात समाविष्ठ नाही प्रबंधात सुरगांणा हे गांव आहे व त्या गावाची महादेव कोळी लोकसंख्या सुद्धा दर्शवली आहे सुरगाणा गांवात *वाघमारे , पिठे , गांगोडे , गांगुर्डे* हे आडनांवे आहेत ती आडनांवे प्रबंधात नाही.
प्रबंधात ननाशि हे गांव दर्शवले आहे व त्या गावची लोकसंख्या सुद्धा दर्शवली आहे त्या गावात *शार्दुल,  घंघाळे , शिदें, झनकर* हे आडनांवे आहेत ते प्रबंधात नाही.
प्रबंधात गिरणारे गांव दर्शवले आहे व महादेव कोळी लोकसंख्या सुद्धा दाखवली आहे पंरतु या गावातील पंचक्रोशीतील  *खोसकर , निपळुगें , निपुगें , फसाळे , गांगोडे,  ठमके* हि आडनांवे प्रबंधात नाही.
आशि ऐक ना आनेक गांवे आहेत जि प्रबंधात समाविष्ठ आहे त्या गावची महादेव कोळी लोकसंख्या दाखवली आहे पंरतु त्या गावातील महादेव कोळी आडनांवे नाहीत.
आपण प्रबंध व्येवस्थीत आभ्यासावा माझ्या *शार्दुल कुटूबांकडे सन 1950 चा आगोदरचे महादेव कोळी आसल्याचे थेट पुरावे आहेत व माझ्या कुटूबातील 27 लोकांचा जातपडताळणी झाल्या आहेत.*
नाशिक जिल्ह्यातील बरीच आडनांवे प्रबंधात समाविष्ठ नाहीत त्याची यादी
*कराटे , खराटे, खोसकर , गोधडे, गागोंडे, गांगुर्डे, ठमके, बठाले, घघांळे, झनकर , फसाळे ,बेंडकुळी, ईनामदार,  सुर्येवंशी, खाबोंरे, पवार, धामोडे ,मडके, मोढें, वाडगे, वाडगांवकर, बागुल  ,घाडगे, चारसकर, चारोसे, चारोस्कर, पिठे, शिदें , वाटाणे, आलबाड, गायकवाड, टोगांरे, गोतरणे, निबांळकर, निबेंकर, निकुळे, निकुले, डगळे, गवारे, निसाळ, वायकंडे, वायखिंडे, वाघमारे, अंडे, सताळे, सहाळे, चहाळे , झुरडे , बर्डे,  पुराणे, श्रीखंडे, शेजवळ, आचारी, गवे, घाटकर, लगरे, रोकडे, चोरटे, कदम, कोगें, खेटरे ,बदादे, बुरडे, शेलार, शार्दुल, गवळी, भोई, भोईर, वारडे, वाडेकर, तादंळे, बुरूगें, नेहेरे, नखुले, गाढवे, पालखेडकर, ढोले, सारूक्ते, वळे, धुळे, दोबाडे, डबांळे, नाईक, पावटे, भुरकूड ,ब्राम्हणे , गुबांडे, रेहेरे , भगरे, वाघले, भवर ,किलबीले ,पिपंळे, ढगे, ससाणे, माळेकर व ईतर*
हि आडनांवे प्रामुख्यांनी नाशिक जिल्ह्यात आढळतात व ती आडनांवे गारे साहेबांचा प्रबंधात नाही.
गारे साहेबांचा प्रबंधात स्पष्ठ पणे म्हटलय कि नाशिक जिल्ह्यातील  काही आडनांवे प्रबंधात नमुद करायची राहीली आहेत.
गारे साहेबांचा प्रबंधात महादेव कोळी समाजाच जो नोटीफाईड ऐरीया दाखवला आहे त्यात नाशिक जिल्हियातील दिंडोरी, त्रबंकेश्वर, पेठ, सुरगाणा, नाशिक ईगतपुरी, सिन्नर पश्चीम, चादंवड, निफाड तालुक्यातील गावांचा समावेश केलेला आहे.
गारे साहेब प्रबंधावर सन 1970 चा दशकात काम करत होते.
त्यावेळची वाहतुक व्येवस्था संपर्काचे माध्येम याचा निश्चीत विचार केला पाहीजे प्रबंध पुरा करताना नाशिक जिल्ह्यातील किती महादेव कोळी लोकसंख्या बहुल भागाला प्रत्येक्ष दैरा काढुन गारे साहेब भेटले आसतील हा सैशोधनाचा भाग आहे.
त्याचा ऊलट गारे साहेबांची कर्म भुमी व जन्म भुमी हि पुणे जिल्ह्यातील आसल्या कारणाने त्यांना पुणे जिल्ह्यातील माहीती मीळवण्यात आडचण हि भासली नाही.
गारे साहेबांनी दिंडोरी तालुक्यातील *पोटीदें* ईगतपुरी त्रबंकेश्वर येथील येथील *झोले* हे  दोन आडनाव समाविष्ठ केलेय *पोटीदें व झोले* आडनांवाचे मुळ गाव पुणे जिल्ह्यात कोठे आहे हा सैशोधनाचा भाग आहे .....?
गारे साहेबांचा प्रबंधात पुणे जिल्हा महादेव कोळी समाजाची खुप खोलवर व विस्तृत माहीती दिली आहे तशीच माहीती नाशिक जिल्ह्यीची नाही.
गारे साहेब प्रबंधाला नाव देतात
*सह्याद्रीतील दर्या खोर्यातील आदिवासी महादेव कोळी* सह्याद्री हा पुणे व आकोला याच बाँडरी पट्यावर संपुन जातोय काय ...?
नाशिक जिल्ह्यात त्रबंकेश्वर,वणी, नादुंरी,चादंवड, सटाणा व पुढे धुळे जिल्ह्यातील साक्री पर्येन्तं सह्याद्री पर्वत रांगा आहेत महादेव कोळी समाजाचा  नोटीफाईड ऐरीया नुसार वणी जवळील नांदुरी हे शवटचे गांव महादेव कोळी लोकांचे वस्तीस्थान म्हणुन सन 1950 मध्ये राष्ट्रपतीनी घोषीत केलय.
दिंडोरी तालुक्याचा महादेव कोळी मुळ वस्तीस्थानातुन वाहाणारे *कादवा व कोलवण* या नद्यांचा आजुबाजूचा परीसरातील कोळी महादेव समाजाचा खोलवर व सविस्तर आभ्यास मुळात गारे साहेबांचा पुस्तकात नाहीच.
दिंडोरी तालुक्याचे भुमीपुत्र डाँ. गोपाळ रामा गवारी यांनी *महादेव कोळी समाजातील लोकसाहीत्याचा वाड:मयीन आभ्यास* तसेच त्यांची पत्नी सै. डाँ .संगीता गोपाळ गवारी यांनी *महादेव कोळी लोककथांचा लोकतत्वीय व वाडमयीन दृष्टीकोनातुन आभ्यास*
हे शोधनिबंध  सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे येथे सादर करून पिऐचडी पदवी पास झाले आहेत.
या दोन्ही शोधनिबंधावर  लवकरच पुस्तक निघणार आसुन या शोधनिबंधात डाँ गोपाळ गवारी यांनी नाशिक जिल्ह्यातील बहुतेक सर्वच नाशिक जिल्ह्यातील  महादेव कोळी समाजाची आडनावे महादेव कोळी समाजाचा रूढी पंरपरा यावर मांडणी केली आहे.
डाँ गोपाळ गवारी लिखीत *कोळवाडा* हा संदर्भ ग्रथं आभ्यासावा यात आपणास नाशिक जिल्हायातील महादेव कोळी समाजाची माहीती मीळेल.
सर्वात महत्वाचे म्हणजे  जव्हार संस्थानाशी निगडीत दिंडोरी व नाशिक जिल्ह्यातील महादेव कोळी समाजाचा ईतीहास हा डाँ.गोपाळ गवारी लिखीत शोधनिबंध *यशवंत* मध्ये आभ्यासता येईल.
नाशिक जिल्ह्यातील जसे गारे साहेबांचा प्रबंधात *शार्दुल* आडनाव नाही  तसे आनेक आडनावे नाहीत म्हणुन नाशिक जिल्ह्यातील महादेव कोळी समाजाला जाती दाखले व जातपडताळणी नाकरली जाते आसे सुद्धा नाही.नाशिक जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाजबांधव सन 1950 पुर्वीचे पुरावे सादर करतात.
मी म्हणतोय म्हणुन आपण माझ्यावर मुळीच विश्वास ठेऊ नका आपण महादेव कोळी समाजाचा नाशिक जिल्ह्यीत येऊन आभ्यास करावा आसे मला वाटते .
कै. डाँ. गोविंद गारे लिखीत *सह्याद्रीतील  दर्याखोर्यातील आदिवासी महादेव कोळी* प्रबंधातील नाशिक जिल्ह्यातील जि गांवे दिली आसतील तेथील महादेव कोळी समाजाचे आडनावे व समाज जिवन आनुभवा व नंतर ठरवा *शार्दुल व आजुन किती आडनावे* गारे साहेबांचा प्रबंधात राहुन गेली.
कळावे ......

कायम सहकार्याचा आपेक्षित ...
*कैलास शार्दुल - संस्थापक -*
आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना

Previous
Next Post »