महादेव कोळी बद्दल

महादेव कोळी

'महादेव कोळी'''''' महादेव कोळी हि आदिवासी जमात सह्याद्रीच्या पर्वत रांगा च्या दऱ्या खोर्यात राहतात .महादेव कोळी हे महादेवाचे पूजक असल्या मुळे त्यांना महादेव कोळी म्हणून संबोधले जाते.महादेव कोळी हे भीमाशंकर च्या डोंगर दर्यात व ठाणे जिल्ह्यातील मोखाडा व जव्हार या भागात टोळ्या - टोळ्यांनी प्रामुख्याने राहतात.आदिवासीन वरील आक्रमणा मुळे आदिवासी शहराकडे येण्या एवजी तो पुन्हा डोंगर दर्यात ढकलला जातोय. महादेव कोळी : एक आदिवासी जमात

महादेव कोळी समाज हा सह्याद्रीच्या कुशीत पुणे ते मुळशीपर्यंत व पुणे ते त्रिंबकपर्यंत आढळतो. जव्हारलाही वस्ती आहे. बालाघाट ऊर्फ महादेव डोंगरात महादेव कोळ्यांचे मूळ वसतिस्थान असावे, असे परंपरा सांगते. अहमदनगर जिल्ह्यातही महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आढळतो. महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत. खंडोबा कोळ्यांचे दैवत आहेत. परंतु महादेव कोळ्यांची वरसुबाई ही रोग बरी करणारी विशेष देवता आहे. महादेव कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्टयपूर्ण आहेत. वाघ्यादेव,हिरवा,महादेव (शिव) इ. देव मानतात. दसरा, दिवाळी, अक्षय्यतृतीया वगैरे सण पाळतात. कमलजा देवीलाही पूजतात. कळसुबाई, जाकुबाई, सतुबाई, रानाई देवींला मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. विठोबाचे माळकरीही समाजात आढळतात. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असतो. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात बुवा - बाजी यात सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे.

महादेव कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती व जंगलातले पदार्थ गोळा करण्याचा असतो. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात हिरडा मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो. समाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते.हलिंद व बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला सट्वीची पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकरी व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून गृहदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात. समाजात मृताला जाळतात किंवा काही भागात पुरतात. लग्न गोत्र घराण्यांत होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात.

पूर्वी बालविवाह प्रचलित होता,यात बदल होणे अपेक्षित आहे आता बाल विवाह होत नाहीत. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे द्याज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते.लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात.आदिवासी महादेव कोल्यांमध्ये हुंडा घेतला जात नाही व दिलाही जात नाही.

आदिवासींवर समाजावर काही बिगर आदिवासी समाज कडून पिळवणूक केली जाते. आदिवासी मुख्यत्वे करून जंगलालील रान मेवा गोळा करून विकण्याचे काम करतो परंतु त्यांना योग्य भाव मिळत नाही. आदिवासी समाजातील सुशिक्षित तरुणांची संख्या बेताचीच आहे. आदिवासी नेत्यांची कमी आहे. आणि जे सुद्धा आहेत ते बिगर आदिवासी समाजाचे गुलाम बनून राहिलेले आहेत.तरीही आज काही प्रमाणात तरुण-उमदा आदिवासी गडी राजकारणात भाग घेऊन धडाडी ने आदिवासींसाठी लढाइ लढत आहेत.आज आदिवासी समाज जागृत झाला आहे.

काळाच्या ओघात यातील काही बाबी मागे पडत चालल्या आहेत. काहींना या आपल्या आदिवासी संस्कृतीचा विसर पडला आहे. तरी आज आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे व ती जपण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे.....

आदिवासी म्हणजे जगातील सर्वात जुनी जमात आहे. ' इतिहास महादेव कोळ्यांच्या शिवनेरीवर झालेल्या संहाराचा…'

पुणे परिसरातील शिवाजी महाराजांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.

ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.

शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्या मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेख देखिल आहेत. दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. या सर्व शिलेदारांना मानाचा मुजरा

Previous
Next Post »