कोळी समाजाची माहिती

🌞समाज जागर वार्ता🌞
     
हर s s s हर s s s महादेव....!
      
         जय s s s    अगस्ती...!

          जय s s s बेरार....!

🌞विचारमंथन➡

☀"कोळी महादेव" जमात व "कोळी" जात ☀

          ✨भिन्नता✨

          ✨समज - गैरसमज✨

"कोळी जात" अनुसूचित जमातीमध्ये     समावेश   नाही. तर अनुसूचित जमातीमध्ये "कोळी महादेव" जमातआहे. आपण नुसते कोळी  नाही.तर खरेखुरे मुळ "महादेव   कोळी"आहोत.

       ☀मा.सर्वोच्च    न्यायालय     ने " माधुरी पाटिल,विरुध्द अप्पर आयुक्त" ठाणे मध्ये तसेच     "आदिवासी विकास विभाग" च्या    शासन निर्णय 24 एप्रिल 1985 च्या    मध्ये "कोळी"ची परिभाषा पुढील प्रमाणे केलेलीआहे. ती अशी कोळी   हे समुद्र किनारी राहतात.

👉🏻 आपन "कोळी महादेव" समुद्र किनारी  मुळातच राहत नाही मग आपण "कोळी" कसे काय ?

     समुद्र किनारी राहणारे "कोळी"   मासेमारी करतात.

👉🏻 आपण "कोळी महादेव"मासेमारी करीत नाही मग आपण आपल्याला "कोळी" कसे समजु शकतो.

      समुद्र किनारी राहणारे "कोळी" नावा वल्हवतात.

👉🏻आपण "कोळी महादेव" नाव वल्हवत नाही.

"कोळी" मिठागारामधे काम करतात मिठागरे चालवितात व्यवसायसुध्दा  करतात.मिठाची विक्री करतात.

👉🏻आपण "कोळी महादेव" मिठागरे चालवितही नाही व्यवसायही करीत नाही विक्रीही करत नाही.

       "कोळी" समाजाचे पारंपारीक      "कोळी"नृत्यआहे.

👉🏻आपण "कोळी महादेव" परंपरे पासुनच आपले "कोळी नृत्य"नाही.

"कोळी" समाजाचा"नारळी पोर्णिमा"    प्रमुख सण आहे.

👉🏻"नारळी पौर्णिमा" आपल्या "कोळी महादेव" जमातीच्या पुर्वजांनीही केली नाही.

    " कोळी "  समाजातील स्त्रियां   विशिष्ट पूर्ण दागिने घालतात.

👉🏻 आपल्या "कोळी महादेव" स्त्रिया   तसले दाग-दागिने घालत नाहित.

"कोळी"समाजातील पुरुषांचा   पेहराव परंपरागत वैशिष्टपूर्ण आहे.

👉🏻"कोळी महादेव" जमातीचा पेहराव मुळातच तसा नव्हे.

     "कोळी" समाज श्रीमंत वर्गापैकी   एक आहे.

👉🏻आपण "कोळी महादेव" पुर्वापारपासुनच मागसलेले आर्थीक विंवचनेत राहीलेले.

🌞 मा.राष्ट्रपतीं च्याआदेशा नुसार घटना यादी 1950 मध्ये बनली      तेंव्हा समुद्राकिनारी राहणारा "कोळी"   समाज हा मुंबई राज्यामध्ये होता. व   त्यांचा समावेश "ओबीसी"  अर्थात "इतर मागासवर्गीय जाती "मध्ये  होता.

👉🏻 1950 ला आपण"कोळी महादेव""सी.पि.एंड बेरार"राज्यामध्ये होतो.व आपण "अनुसूचित जमातीमध्ये "च होतो.
            मग आपण "कोळी महादेव"  आणि "कोळी" एक सारखे कसे शासनाला  कोणी विचारलेच नाही. यामध्ये गल्लत झाली नाही का...?

☀ "जाती" व "जमाती" मध्ये संबंध    नसतो असे शासन म्हणते मग   आमचा "कोळी महादेव" जमातीचा आणि "कोळी" जातीचा समाजाचा "रोटी-बेटी" संबंध नाही. मग "कोळी"जात व आम्ही "कोळी महादेव" जमात सारखे  कसे काय असणार...?

👉🏻 आम्ही "कोळी महादेव" "महादेवा"चे पुजक आहोत तो"कोळी" समाज मुळातच "महादेवाचा"पुजक नाही.आम्ही "कोळी महादेव" आहोत नुसते "कोळी" नाही.

☀ "Central proviences and   berar "चे gazatte नुसार "बेरार " मध्ये "महादेव कोळी"असल्याचे  काही पुरावे "

👉🏻"gazette➡ "caste and tribes of central   proviences "published    under administration of   central proviences volume      "1"and "3" Gazette of   "central proviences and   berar "published by       goverment of "central   proviences and berar" in   1948,Volume "XVllll"
       
Draft of constitution .    Published as gazette of    india  sign by chairman of   constitution
Dr.B. R.Ambedkar

☀Gazette of "hyderbad   assign district commanly   called as "berar" published      in 1870"

👉🏻 "Berar gazette    published in 1910"

"Caste and tribes of  bombay  presidency " by   enthonven published by    goverment of bombay In   1918"
            
☀"Tribal in an urben    setting By   "Govind Gare . Commissioner of tribal  reaserch and training   institute Pune"

       ☀Geographical  society   of  bombay published  by  goverment of bombay.

         Rules   of  scholorship Circular by central   proviences and berar In  1949.

         👉🏻 "Circular of rural   development department     of  madhyapradesh in  1950"

🌞 आपण "कोळी महादेव"आपल्या   प्रत्येक गावात"महादेवा" चे मंदिर  आहे कारण आपले ते   मुळ दैवत  आहे.

       👉🏻"कोळी" जात ही आपल्या   "महादेवा"ला पुजत नाही.ही आपली "कोळी महादेव" जमातीची प्राचिन संस्कृती आहे.

🌞 अकोला जिल्ह्यातील अकोला- चौहट्टा-अकोट दरम्यान असलेल्या  "रेल " या गावात "महादेव-पार्वती"   चे दर वर्षी "लग्न "साजरे होत असते  ही आपली " कोळी महादेव" जमातीची खरी परंपरा कारण   आपण "महादेव कोळी"आहोत. "कोळी" जातीमध्येे ही परंपरा नाही.

🌅उगमस्थान
          
      🌞 हर s s s हर s s s महादेव....!

         ☀कोळी महादेव समाजाचे मुळ उगमस्थाना बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने विचार मंथन करीत आहोत.

      🌞आपला देव महादेव🌞
            आपले पुर्वीचे वास्तव जंगलातील पर्वत रांगामधील यामध्ये राहणारा आपला समाज मागसलेला म्हणजेच आदीवासी.
          प्रत्येक समाजाला दैवत असते आपल्या समाजाचे दैवत "महादेव"

आदिवासी देव "महादेव"ा चे जंगला मध्ये वास्तव्य. "महादेव" आपले  समाजाचे मुळ दैवतअसुनआपल्या  हिन्दु धर्माच्या जातीत प्रामुख्याने  "महादेव" दैवताचा उल्लेख म्हणजेच "हिंदु महादेव कोळी" असा होय.

सालबर्डी ला आपले"महादेव" दैवत आहे. .सालबर्डी ला "लहान महादेव" तेथून  पुढे  गेल्यानंतर "पचमढ़ी" ला "मोठा महादेव". तेथे महादेवाची पुर्वी पासुनच पूजा अर्चना करणारे मुळ महादेव  कोळी होत.

"शिवा की झोली उसमें का कोली"

आणि तेच "महादेव कोळी" चे उगम स्थान आहे.

🌞हर s s s हर s s s महादेव....!

समाजहितार्थ

प्रवक्ता तथा जनसंपर्क अधिकारी

पत्रकार प्रमोद ग. बोपटे
बेरार कोळी महादेव आदिवासी संस्था आपातापा
पो. आपोती खुर्द
ता.जि. अकोला ४४४००३(बेरार)
9158690763

Previous
Next Post »